Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्पावधीतच टायगरने 'अॅक्शन हीरो' म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. टायगर श्रॉफचं खरं नाव हेमंत श्रॉफ आहे. पण जॅकी श्रॉफ कायम त्याला 'टायगर' या नावाने हाम मारत असल्याने पुढे तेच नाव रुढ झालं. 


टायगर आज बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता असला तरी त्याला अभिनेता होण्याची कधीच इच्छा नव्हती. शाळेत असताना टायगर फुटबॉल खेळत असे. तसेच त्याला नृत्याची आणि व्यायामाचीदेखील आवड होती. त्यामुळे टायगरला खेळाडू व्हायचं होतं. वडील एक उत्कृष्ट अभिनेते असल्याने त्यांच्यासोबत सतत तुलना होऊ शकते यामुळेदेखील टायगरला अभिनयक्षेत्रात यायचं नव्हतं. पण अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर टायगरने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. 'बागी 2','स्टूडेंट ऑफ द इयर','वार','बागी 3' अशा अनेक सिनेमांत टायगरच्या अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला आहे. 


लव्हलाईफमुळे टायगर श्रॉफ चर्चेत! (Tiger Shroff Love Life)


टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सिनेमांसह लव्हसाईफमुळे अनेकदा चर्चेत असतो. टायगरचं नाव बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबत (Disha Patani) जोडलं गेलं आहे. टायगर आणि दिशा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. पण अद्याप दोघांनीही त्यांचं नातं जगजाहीर केलेलं नाही. 


टायगरचा 'हा' डायलॉग व्हायरल


टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या सिनेमातील डायलॉग सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सिनेमात टायगर कृती सेननला म्हणतो,"छोटी बच्ची हो क्या?". टायगरचा हा टायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 






कोट्यवधींचा मालक टायगर श्रॉफ (Tiger Shroff Net worth)


टायगर श्रॉफ सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतो. एका सिनेमासाठी 'अॅक्शन हीरो' 8 कोटी मानधन घेतो. तर एका जाहिरातीचे तो दोन-तीन कोटी घेतो. वर्षभरात टायगर 12 कोटींची कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती 81 कोटी आहे. आलिशान घरासोबत अनेक महागड्या गाड्यादेखील त्याच्याकडे आहेत. 


संबंधित बातम्या


Tiger Shroff : शूटिंगदरम्यान अॅक्शन स्टारचा अपघात; टायगर श्रॉफने शेअर केला व्हिडीओ