टायगर आणि दिशा पाटणीचं 'बेफिक्र' गाणं रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2016 05:42 PM (IST)
नवी दिल्लीः अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पाटणी यांचं 'बेफिक्र' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात दोघांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दिशा पाटणीचा या गाण्यात हॉट अवतार पाहायला मिळत आहे. टायगर आणि दिशा यांच्या अफेअरबद्दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. त्यातच या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री पाहून दोघांच्याही चाहत्यांना चर्चेला नवीन विषय मिळू शकतो. पाहा गाण्याचा व्हिडिओः