मुंबई : 'आयफा 2016'मध्ये परफॉर्म करताना शाहिद आणि फरहान यांना धमाल केली. या दोघांनी कधी सेन्सॉर बोर्डाला चिमटा काढला, तर कधी पुरस्कार वापसीवर विनोदी अंगाने भाष्य केलं. इतकंच नव्हे, मीराच्या प्रेग्नंसीवरही शाहीदने विनोद करत प्रतिक्रिया दिली.

 

पप्पू आणि राजू नावाच्या भूमिका साकारत शाहिद आणि फरहानने गेल्या वर्षभरातील वाद-विवादांवर विनोदी अंगाने भाष्य केलं.

 

गेल्या वर्षी शाहिदच्या लग्नाची चर्चा जोरात होती. मात्र, शाहिदने लग्न केल्यानंतरच या सर्व चर्चा थांबल्या. यावर बोलताना शाहिद म्हणाला, गेल्या वाद-विवादांच्या केंद्रस्थानी माझं लग्न होतं.

 

दिल्लीतल्या मीरा राजपूतसोबत शाहिदने लग्न केलं. शाहिद-मीराच्या लग्नाला एक वर्षही अजून पूर्ण झालं नाही. मात्र, आताच मीराच्या प्रेग्नंसीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर बोलताना शाहिद म्हणाला, "सबसे बडा तहलका, मैं बाप बननेवाला हूँ"

 

अर्थात शाहिद हे विनोदी अंगाने म्हणाला आहे की, गंभीरतेने, हे अद्याप कळू शकलेलं नाही. कारण आयफा सोहळ्यानंतर त्याने या वृत्ताला अद्याप दुजोराही दिलेला नाही.