Thor Love And Thunder Affected Bollywood Films : गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दाक्षिणात्य सिनेमानंतर आता हॉलिवूड सिनेमांनी बॉलिवूड सिनेमांना मागे टाकलं आहे. 'भूल भुलैया 2' या सिनेमाला सोडलं तर सध्या प्रदर्शित झालेले 'जुग जुग जिओ', 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट', 'राष्ट्रीय कवच ओम' सारखे अनेक बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. तर दुसरीकडे 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love And Thunder) धुमाकूळ घालत आहे.
'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा भारतीयांच्या पसंतीस उतरत आहे. भारतात या सिनेमाचा चांगलाच दबदबा पाहायला मिळत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. 7 जुलैला हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 18.60 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे विकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करेल असे म्हटले जात आहे.
'जुग जुग जिओ'ला बसला फटका
'थोर लव्ह अॅन्ड थंडर' या सिनेमामुळे 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने फक्त 70 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे.
'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सचा हा 29 वा सिनेमा आहे. या सिनेमात थोर अॅक्शनसह रोमॅंटिक अंदाजातदेखील दिसणार आहे. हा सिनेमा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. टायका वायटीटीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम केलं आहे.
संबंधित बातम्या