Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone) हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच आलियाने या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

Continues below advertisement


'हार्ट ऑफ स्टोन' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज


आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात आलियासह हॉलिवूड अभिनेत्री गैल आणि जेमी डोर्ननदेखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टॉम हार्परने सांभाळली आहे.






आलियाने लिहिली खास पोस्ट


आलिया भट्टने 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर करत लिहिले आहे,"हार्ट ऑफ स्टोन' हा सिनेमा अनेक गोष्टींची शिकवण देणारा आहे. गैल गेडोट आणि टॉम हार्पर यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार. आता प्रतीक्षा सिनेमाची". या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याने आता आलिया मुंबईला रवाना झाली आहे. 


आलियाचे आगामी सिनेमे


'हार्ट ऑफ स्टोन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तर या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या सीक्वेलमध्ये आलियादेखील मुख्य भूमिकेत दिसेल. आलिया आणि रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर रणवीर सिंहसोबतचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'डार्लिंग्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


संबंधित बातम्या


Alia Bhatt Pregnant : आलिया लंडनमध्ये करतेय हॉलिवूडच्या सिनेमाचे शूटिंग; लवकरच परतणार भारतात


Darlings Official Teaser : 'क्या एक मेंढक और बिच्छू दोस्त हो सकते है?'; डार्लिंग्सचा धमाकेदार टीझर रिलीज