Pravin Tarde : मराठमोळे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. प्रवीण तरडेंचे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer Mukkam Post Thane) आणि 'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हे दोन्ही सिनेमे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता या सिनेमांसाठी प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने (Shahir Dada Kondke Award) सन्मानित करण्यात आले आहे. 


प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रवीण तरडेंनी खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रवीण तरडेंनी शेअर केलेला फोटो 'शाहीर दादा कोंडके पुरस्कार 2022' ने सन्मान केल्यादरम्यानचा आहे. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' आणि 'सरसेनापती हंबीरराव' या दोन्ही सिनेमांसाठी प्रवीण तरडे यांना सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 






प्रवीण तरडेंची पोस्ट काय? 


प्रवीण तरडे यांनी खास पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"शाहीर दादा कोंडके पुरस्कार 2022 - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक... यंदाचा हा मानाचा पुरस्कार 'सरसेनापती हंबीरराव' आणि 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शनासाठी मिळाला आहे. या दोन्ही सिनेमांसाठी अहोरात्र झटलेल्या प्रत्येकाला हा पुरस्कार समर्पित".  


प्रवीण तरडेंच्या 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमाने आता सातव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या दोन्ही मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिनेमासाठी प्रेक्षकांनी प्रवीण तरडेंचे भरभरून कौतुक केलं आहे. 


संबंधित बातम्या


Dharmaveer : 'धर्मवीर' ठरला 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा; सिनेमाच्या टीमने मानले आभार


‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा शो रद्द, बुलढाण्यातील प्रेक्षकांची चित्रपटगृह चालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार!