OTT : प्रेक्षकांसाठी यंदाचा विकेण्ड खास ठरणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक गोष्टी आहेत. एकीकडे नेटफ्लिक्सवर कार्तिक आर्यनचा 'धमाका' सिनेमा आहे. तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता रवि दुबेचा एक कार्यक्रम एमएक्स प्लेअरवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. अॅमेझॉन प्राइमवर 'द व्हील्स ऑफ टाइम' आहे. त्यामुळे या विकेण्डला प्रेक्षकांनी घरीच पॉपकॉर्न खात चांगल्या सिनेमांचा आणि सीरिजचा आस्वाद घ्यायला हवा.
MATSYA THADA - MX PLAYER : छोट्या पडद्यावरील रवि दुबेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याचा 'मस्ती थडा' हा कार्यक्रम एमएक्स प्लेअरवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. देशभरात अनेक गुन्हे केलेल्या चोराभोवती या कार्यक्रमाचे कथानक आहे.
HELLBOUND - NETFLIX : लोकं त्यांच्या स्वत:च्या मृत्यूबद्दलच्या भविष्यवाण्या कशा ऐकतात ते हेलबाउंडमध्ये दाखवण्यात आले आहे.
DHAMAKA - NETFLIX : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'धमाका' सिनेमा प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. कार्तिक आर्यनचा 'धमाका' चित्रपट हा कोरियन चित्रपट 'द टेरर लाइव'चा हिंदी रिमेक असणार आहे. कार्तिक यात अर्जुन पाठक या नावाजलेल्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट भारतीय पत्रकारितेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले असून रॉनी स्क्रूवाला यांनी याची निर्मीती केली आहे.
CASH - DISNEY + HOTSTAR : कॅशचे दिग्दर्शन ऋषभ सेठने केले आहे. बँकांनी जुन्या नोटा स्वीकारणे बंद करण्यापूर्वी 52 दिवसांपेक्षा कमी कालावधीत 5 कोटी रुपयांचा काळा पैसा साफ करण्याची योजना सिनेमातील पात्रांनी आखली आहे.
संबंधित बातम्या