मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर नेटकऱ्यांनी बॉलिवूडवर टीकेची झोप उठवली. खासकरून आपल्या कटुंबीयांच्या सावलीत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टार किड्सना नेटकऱ्यांनी धारेवरच धरलं. अनेक बॉलिवूड स्टार्स, दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत होती. यावर बोलताना प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नसल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, 'जर बॉलीवूडमध्ये नेपोटिझम असत तर माधुरी दीक्षित, कंगना रनौत, अक्षय कुमार यांसारखे कलाकार मोठे स्टार बनले नसते. एवढचं नव्हेतर ते एक यशस्वी निर्माता दिग्दर्शक झाले नसते. इंडस्ट्रीमध्ये मेहनत करणाऱ्या व्यक्तिला काम मिळतं आणि सुशांतने देखील आपल्या मेहेनतीन इंडस्ट्रीमध्ये काम मिळवलं होत.'


सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्वात खळबळ माजली होती. सुशांतच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची चौकशी केली. काल प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सदर प्रकरणी आपला जबाब नोंदवला. त्यावेळी त्यांनी पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. भन्साळी यांनी पोलिसांना सांगितले की, 'सुशांतच्या कामावरुन तो खूप प्रभावित झाला आहे आणि त्याला आपल्या चित्रपटासाठी कास्ट करण्याची इच्छा होती पण तसं होऊ शकल नाही. यशराजने त्यांना सांगितले की सुशांत त्यांचा बीग बजेट चित्रपट पानी करत आहे. त्यामुळे सुशांतला कास्ट करता आलं नाही.'


भन्साळींनी पोलिसांना सांगितले की, 'इंडस्ट्रीमध्ये ही गोष्ट सामान्य आहे, कधीकधी आपल्याला काही कलाकारांसोबत काम करायचे असते. पण बर्‍याच कारणांमुळे ते शक्य होत नाही. मी कटरीना सोबत तीन वेळा चित्रपट करण्यासाठी प्रयत्न केला पण तारखा न जुळल्यामुळे मी तिला कास्ट करू शकलो नाही. मी रामलीलासाठी आधी सलमान आणि ऐश्वर्या यांना कास्ट करायचे ठरवले होते पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये हे घडतच राहते आणि हे कलाकारांनाही चांगले माहित आहे.'


पाहा व्हिडीओ : संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?



साधारणतः 3 तासांच्या चौकशीनंतर वांद्रे पोलीस स्टेशनला रवाना झालेले संजय लीला भन्साळी यांनी नंतर मुंबईतील सांताक्रूझ पोलीस स्टेशन गाठले होते. तेथे डीसीपी अभिषेक त्रिमुखे आणि त्यांच्या टीमने 1 तासासाठी त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली, तिथे संजय लीला भन्साली यांनी ही माहिती दिली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये संजय लीला भन्साळी यांना एकूण 30 ते 35 प्रश्न विचारले गेले होते त्यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.


2013 मध्ये आलेल्या रामलीला आणि 2015 मध्ये बाजीराव मस्तानीसाठी मी दोन वेळा सुशांत सिंह राजपूतला विचारणा केली होती. त्यावेळी तो यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गंत बनत असलेल्या 'पानी' चित्रपटाच्या वर्कशॉप आणि शेड्यूलमध्ये व्यस्त होता. एक दिग्दर्शक म्हणून मला त्याचं संपूर्ण लक्ष आणि समर्पण हवं होतं. परंतु त्याच्याच व्यस्त शेड्यूलमुळे सुशांतने स्वत:च या दोन्ही चित्रपटांसाठी मला नकार दिला. यानंतर मी सुशांतला पुन्हा चित्रपटांबाबत कोणतीही बातचीत केली नाही."


"इतर अभिनेत्यांना/कलाकारांना ओळखतो त्याप्रमाणेच मी सुशांतला ओळखत होता. तो माझ्याशी वैयक्तिक गोष्टी शेअर करेल एवढं आमचं नातं जवळकीचं नव्हतं. त्याच्या नैराश्येबाबत मला काही कल्पना नव्हती. 2016 नंतर मी सुशांत सिंह राजपूतला फक्त तीन वेळा फिल्म शोमध्ये भेटलो होतो, पण यावेळी माझी त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्याबाबत किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत चर्चा झाली नाही," असं संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं.


सुशांतची राहत्या घरी आत्महत्या


सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?


Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास