Satyameva Jayate 2 Trailer : बॉलिवूड अभिनेता (John Abraham) च्या 'सत्यमेव जयते 2' सिनेमाची चाहते प्रतिक्षा करत आहेत. आज या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरवरुन सिनेमाचे कथानक उत्तम असेल याचा अंदाज येतो आहे. सिनेमात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.


 





 



लवकरच 'सत्यमेव जयते 2' सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात ट्रेलर तर धमाकेदार आहे. ट्रेलरमधील जॉन अब्राहमचा अभिनय खूपच दर्जेदार झालाय. त्यात त्याला साथ दिव्या खोसलाने दिलीय. सिनेमातील कलाकार सिनेमात भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना दिसून येणार आहेत. चित्रपटात अॅक्शनचा तडका असेल हे चित्रपटाच्या ट्रेलरवरुन लक्षात येत आहे. दिड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सिनेमा आता प्रदर्शित होतो आहे. हा सिनेमा देशभक्तिवर आधारित असणार आहे.





 


 


National Film Awards : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण; पाहा विजेत्यांची यादी



जाणून घ्या सिनेमा कधी प्रदर्शित होणार


'सत्यमेव जयते 2' सिनेमा 'सत्यमेव जयते' सिनेमाचाच पुढचा भाग असणार आहे. यात जॉनने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका स्विकारली आहे. प्रेक्षक या सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिव्या संघर्ष करताना दिसून येणार आहे. 2018 साली प्रदर्शित झालेला 'सत्यमेव जयते'देखील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा होता. तर 'सत्यमेव जयते 2' मध्ये भ्रष्टाचार अधिक विस्तारात दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


Antim Motion Poster : सलमानने शेअर केलं 'अंतिम' चे पोस्टर, चाहत्यांची उत्सुकता शिगेला