नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी अभिनेता शाहरुख खानच्या 'रईस'वर निशाणा साधला आहे. जो 'रईस' देशाचा नाही, तो देशाच्या कामाचा नाही, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शाहरुखवर हल्लाबोल केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करुन 'रईस' लोकांना जमिनीवर आणलं. आता 'काबिल' देशभक्ताचा हक्क एखाद्या 'रईस'ने हिरावून घेऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी देशाच्या जनतेची आहे, असं विजयवर्गीय म्हणाले.

https://twitter.com/KailashOnline/status/822832221794877440

विजयवर्गीय यांची ट्विटर पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहींनी त्यांचं समर्थन केलं आहे. तर काहींनी त्यांच्या मताला विरोधही केला आहे.

शाहरुखचा 'रईस' आणि अभिनेता हृतिक रोशनचा 'काबिल' बॉक्स ऑफिसवर 25 जानेवारीला एकाच दिवशी रिलीज होत आहे. त्यामुळे विजयवर्गीय यांनी अप्रत्यक्षपणे 'रईस'वर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.