नवी दिल्ली : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज 77 वी जयंती आहे. 29 डिसेंबर 1942 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे राजेश खन्ना यांचा जन्म झाला. राजेश खन्ना यांनी त्यांच्या करकिर्दीत चित्रपट क्षेत्रात यशाचे शिखर गाठले होते. राजेश खन्ना यांचे चाहते अक्षरश: वेडे होते. त्यांची गाडी ज्या रस्त्यावरुन जायची, त्या रस्त्यावरची धूळ मुली सिंदूर म्हणून लावत असे.

चित्रपट कारकिर्दीला सुरुवात
राजेश खन्ना यांनी नेहमी आपल्या यशाचं क्रेडिट रंगमंचाला दिला. त्यांच्या चित्रपट सृष्ठीच्या प्रवासाला रंगमंचामुळेच सुरुवात झाली होती. 1965 साली यूनायटेड प्रोड्यूसर्स फिल्मफेयर टॅलेंट स्पर्धा त्यांनी जिंकली होती. 10 हजारांपेक्षा जास्त तरुणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या विजयानंतर राजेश खन्ना यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

राजकारणातही आजमावलं नशिब
बॉलिवूडमध्ये यशाचे शिखर गाठल्यानंतर राजेश खन्ना यांनी राजकारणातही आपलं नशिब आजमावलं होतं. त्यांनी 1990 साली भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या विरोधात दिल्लीतून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा अवघ्या 1500 मतांनी पराभव झाला होता. त्यांनतर हवाला घोटाळ्यात आडवाणी यांच नाव आल्याने त्यांनी खासदार पदाचा राजीनामा दिला. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा सामना अभिनेते शत्रुघ्न सिंन्हा यांच्याशी झाला. त्यातही त्यांना पराभावाचा सामना करावा लागला.

अखेरचा संदेश
राजेश खन्ना 1969 ते 1974 या दरम्यान अनेक हिट चित्रपट दिले. त्यामुळे त्यांच्या चाहता वर्गही खूप मोठा होता. मात्र त्यांच्या आखेरच्या काळात ते खूप एकटे पडले होते. त्यांनी मृत्यूच्या पूर्वी एक भावूक संदेश रेकॉर्ड करुन ठेवला होता. त्यांच्या अंत्यविधीवेळी त्यांच्या दोन मुली ( ट्विकंल आणि रिंकी ) यांनी तो संदेश उपस्थितांना ऐकवला होता. ज्यात त्यांनी म्हटंल होत, की
'नेहमी भविष्याबद्दल विचार करावं, जी वेळ निघून गेली त्याबद्दल विचार का करायचं, मात्र जेव्हा परिचित चेहरे अपरिचित ठिकाणी भेटतात, तेव्हा आठवणी पुन्हा ताज्या होतात.' राजेश खन्ना यांचा अखेरचा संदेश अनेकांना भवूक करुन गेला.