The Kerala Story Fame Adah Sharma Reply To Users : अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमामुळे चर्चेत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अभिनेत्रीचं प्रचंड कौतुक होत आहे. अदा शर्मा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आता एका नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिनेत्री भडकलेली दिसून आली आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


अदा शर्माने 'द केरळ स्टोरी' संदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की,"केरळातल्या मुली एवढ्या गोऱ्या नसतात". या नेटकऱ्याच्या कमेंटवर अदा खूपच भडकली आहे. तिने कमेंट करत लिहिलं आहे,"मी केरळची अदा शर्मा आहे. मल्याळम अभिनेत्री साई पल्लवी, नित्यामेननचं काय मग". 


'द केरळ स्टोरी'बद्दल अदा शर्मा म्हणाली... (Adah Sharma On The Kerala Story)


एका मुलाखतीत 'द केरळ स्टोरी'बद्दल बोलताना अदा शर्मा म्हणाली,"द केरळ स्टोरी' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अनेकांना हा सिनेमा म्हणजे प्रोपोगंडा वाटतोय, याची मला खंत वाटते. मुली गायब कशा होत आहेत, धर्मांतर करण्यासाठी त्यांना भाग कसं भाग पाडलं जात आहे? या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. या सिनेमासाठी मी 100% दिले आहेत. 


प्रपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याने 'द केरळ स्टोरी'ला विरोध


'द केरळ स्टोरी' या सिनेमाचा ट्रेलर 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमा रिलीज होण्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमावर प्रचंड टीका होत आहे. या सिनेमात चुकीच्या गोष्टी दाखवत असल्याचा तसेच या सिनेमाच्या माध्यमातून प्रपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याने या सिनेमावर विरोध होत आहे. 


'द केरळ स्टोरी'बद्दल जाणून घ्या... (The Kerala Story Details)


सत्यघटनेवर आधारित असलेल्या 'द केरळ स्टोरी'चा (The Kerala Story) ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात अदा शर्मासह योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या अभिनेत्रीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


The Kerala Story : अंगावर शहारे आणणाऱ्या 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर आऊट; युट्यूबवर अल्पावधीतच मिळाले 72 लाख व्ह्यूज