The Keral Story Box Office Collection Day 12 : 'द केरळ स्टोरी' (The Keral Story) या सिनेमाला रिलीजआधी आणि रिलीजनंतर अनेक वादांचा सामना करावा लागला आहे. काही राज्यांत या सिनेमावर बंदी घालण्यात आली. पण रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाला भरभरुन प्रेम मिळाले. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आले.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाने रिलीजच्या नवव्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला होता. आता रिलीजच्या 12 व्या दिवशी या सिनेमाने 150 कोटींचा आकडाही पार केला आहे. तसेच 2023 सालच्या ब्लॉकबस्टर सिनेमात या सिनेमाचा समावेश झाला आहे.
'द केरळ स्टोरी'ची कमाई जाणून घ्या... (The Kerala Story Box Office Collection)
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित होऊन 12 दिवस झाले असून आजही या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे उच्चांक गाठताना दिसत आहे. 'द केरळ स्टोरी'ने रिलीजच्या 12 व्या दिवशी 9.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत रिलीजच्या 12 दिवसांत या सिनेमाने 156.84 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
'द केरळ स्टोरी'ची वाटचाल 200 कोटींच्या दिशेने!
'द केरळ स्टोरी' 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. त्यामुळे आता येत्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा 200 कोटींच्या कल्बमध्ये सामील होऊ शकतो, अशी निर्मात्यांना आशा आहे. 2023 मधील 'द केरळ स्टोरी' हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे.
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी मुख्य भूमिकेत आहेत. 40 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी सांभाळली आहे.
देशभरात हा सिनेमा 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचं काही मंडळींचं मत असलं तरी सिनेमा म्हणून उत्तमप्रकारे या सिनेमाची बांधणी केली आहे, असं प्रेक्षकांचं मत आहे. विविध ठिकाणी या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहेत. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या