The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 11 मार्चला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.





'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा 1989 आणि 1990 सालातील काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर थेट भाष्य करतो. हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे. या सिनेमावर उत्तर प्रदेशचे रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. सिनेमाच्या ट्रेलरवरून हा सिनेमा मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांच्या केलेल्या हत्येवर आधारित असल्याचं भासत आहे. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचं याचिकेत म्हटलेलं होतं. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.





विवेक अग्निहोत्री यांनी 'द काश्मीर फाइल्स'सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Kiran Mane : किरण मानेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत केले नागराज आणि 'झुंड'चे कौतुक


Shabaash Mithu : 'ती माझ्यासारख्या लाखो लोकांना प्रेरणा देते'; तापसी पन्नूने शेअर केले 'शाबास मिथू'चे नवे पोस्टर


Baipan Bhari Deva : तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट, केदार शिंदेंनी केली 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha