मुंबई : विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'द कश्मीर फाइल्स'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरुच आहे. चित्रपटाने आठव्या दिवशीच 100 कोटी रुपये कमावत कमाईचे सर्व विक्रम मोडले. एवढचं नाही तर द कश्मीर फाईल्सने आठव्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत आमीर खानच्या 'दंगल'चाही रेकॉर्ड मोडला.


'द कश्मीर फाइल्स'ची धुवांधार कमाई
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "द कश्मीर फाइल्सने इतिहास रचला आहे. आठव्या दिवशी चित्रपटाने 19.15 कोटी रुपये कमावले. हे कलेक्शन बाहुबली 2 (19.75 कोटी) च्या जवळ असून दंगल (18.59 कोटी) पेक्षा जास्त आहे. हे दोन्ही आयकॉनिक हिट्स आहे. 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट ऑल टाईम ब्लॉकबस्टर्स सिनेमाच्या यादीत समाविष्ट झाला आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने शुक्रवारी 19.15 कोटी रुपये कमावले. भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 116.45 कोटी झालं आहे." 






दरम्यान दुसरा आठवडा संपेपर्यंत हा चित्रपट 150 कोटी रुपयांचा आकडा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. द कश्मीर फाईल्सने आठव्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग दणक्यात सुरु आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्येही डब करण्यात येणा आहे. याचा अर्थ 'द कश्मीर फाइल्स'ची येणाऱ्या दिवसातील कमाई आणखी चांगली असेल. हा चित्रपट जबरदस्त चर्चेत आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल अनेकांची उत्सुकता वाढलेली आहे. 


'द कश्मीर फाइल्स'बाबत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाला पहिल्यापेक्षा जास्त स्क्रीन्स मिळाल्या आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाला 600 स्क्रीन्स मिळाल्या होत्या. तर आठव्या दिवसापर्यंत स्क्रीन्सची संख्या 4000 पर्यंत पोहोचली. काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर बनलेल्या या चित्रपटाचं कौतुक होत आहे. 


संबंधित बातम्या