‘मोगली’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘द जंगल बुक’ची भारतात छप्परफाड कमाई
Continues below advertisement
मुंबई : ‘द जंगल बुक’ सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘द जंगल बुक’ने 150 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाची आतापर्यंत भारतातील कमाई 158 कोटी झाली आहे. 8 एप्रिलला हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला होता.
ट्रेड अनॅलिस्ट तरन आदर्श यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ‘द जंगल बुक’ने चौथ्या आठवड्यापर्यंत 158 कोटी 92 लाखांची कमाई केली आहे. सिनेमाने शुक्रवारी 1.78 कोटी, तर शनीवारी 3.53 कोटींची कमाई केली होती. ही कमाई शुक्रवारपेक्षा 98.31 टक्क्यांनी अधिक आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/726646135339638784
विशेष बाब म्हणजे या सिनेमाच्या रिलीजनंतर बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा ‘फॅन’ सिनेमाही रिलीज झाला होता. मात्र, फॅन सिनेमाला मागे टाकत, ‘द जंगल बुक’ने छप्परफाड कमाई केली आहे.
Continues below advertisement