व्हाईट हाऊस करस्पाँडन्ट डिनरसाठी प्रियंकालाही निमंत्रण देण्यात आलं होतं. व्हाईट हाऊसचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेतर्फे या मेजवानीचं आयोजन केलं जातं आणि त्यातून पत्रकारितेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी निधी उभा केला जातो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह सेलिब्रिटी, राजकीय नेते, पत्रकार अनेक मान्यवर या डिनरला उपस्थिती लावतात. यंदा प्रियंकालाही या डिनरला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये प्रियंका अतिशय सुंदर दिसत होती.
प्रियंका चोप्राने ट्विटरवर या डिनरचे फोटो शेअर केले असून, फोटोला कॅप्शनही अत्यंत सुंदर दिलं आहे. बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांची स्तुती ट्वीटच्या कॅप्शनमधून केली असून, त्यांच्यासोबतची चर्चा अत्यंत छान झाल्याचंही प्रियंकाने सांगितलं आहे.
‘क्वांटिको’च्या माध्यमातून हॉलिवूड जगतात लोकप्रिय ठरलेली प्रियंका सध्या ‘बेवाच’ या हॉलिवूड सिनेमात काम करत आहे.