मुंबई : महाराष्ट्रातील तमाम सिनेरसिकांना सध्या नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने अक्षरश: ‘याड’ लावलं आहे. या चित्रपटाताने प्रेक्षकांची मनं जिंकलीच आहेत, मात्र नागराजच्या या सिनेमाने ‘द ग्रेट खली’लाही भुरळ घातली आहे.


 

अजय-अतुलच्या गाण्यांनी या सिनेमाला आणखी उंचावर नेलं आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गज आणि मान्यवरांनी तर या चित्रपटाला भरभरुन प्रेम दिलं आहे. त्याच यादीत आता एक नवीन चाहत्याचा समावेश झाला आहे. तो म्हणजे द ग्रेट खली. खलीने सैराटचा ट्रेलर आणि गाणी पाहिली.

 

 

“मला भाषा समजली नसली, तरीही मी गाणी खूप एन्जॉय केली आणि मला त्यांच संगीत खूप आवडलं.” असं खलीने स्वत: एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. हा व्हिडीओ मयुर हांडे या तरुणाने फेसबुकवर शेअर केला आहे, तर संदीप टिकोने यांनी खलीला ही गाणी दाखवली आहेत.

 

पाहा व्हिडीओ :