मुंबई : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सैराटने मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. यानंतर पहिल्यांदाच सैराटचा दिग्दर्शक नागरजा मंजुळेने प्रतिक्रिया दिली आहे. नागराजने त्याच्या फेसबुक वॉलरुन एक पोस्ट अपलोड करत आपला आनंद व्यक्त केला आहे.


 

नागराज म्हणतो...

 

नागराजने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “कमाईचं रेकॉर्ड" हा आनंद तर आहेच मात्र शहरापासून गावखेड्यापर्यंत कधीही चित्रपट गृहात न येणारा माणूस सैराट बघतोय याचा आनंद जास्त आहे. चांगभलं!” याचसोबत, “दिले वाऱ्याहाती माप, तोच त्याचा मायबाप!”, या संत तुकाराम महाराजांच्या पंक्तीही नागराजने फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत.

 



 

महाराष्ट्रभरातील सिनेरसिकांनी परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या विकेंडमध्ये म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात  तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला आहे.

 

 

‘सैराट’ने शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4 कोटी 85 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.  मराठीत पहिल्या विकेंडला इतकी कमाई करणारा सैराट हा पहिलाच सिनेमा ठरला आहे.

 

संबंधित बातम्या :


रिव्ह्यू : याड लावणारा 'सैराट'


बॉक्स ऑफिसवर सैराट सुसाट, तीन दिवसात 12 कोटींचा गल्ला


'सैराट'च्या आर्चीची 'झिंगाट' कामगिरी, नववीत 81.60 टक्के !


VIDEO : भर थिएटरमध्ये ‘झिंगाट’वर सांगलीकर ‘सैराट’


राज्यभरात 'सैराट'चं याड, पुण्यात हाऊसफुल्ल