Thalapathy Vijay Leo Box Office Collection : थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' (Leo) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. रिलीजआधीपासून हा सिनेमा चर्चेत होता. आता रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.
'लियो'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Leo Box Office Collection)
'लियो' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 64.8 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 35.25 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 39.8 कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या दिवशी 41.55 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या पाचव्या दिवशी आतापर्यंत या सिनेमाने 25 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत 'लियो' सिनेमाने भारतात 206.40 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 363.4 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'लियो'ची रेकॉर्डब्रेक कमाई!
'लियो' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रिलीजच्या चार दिवसांतच या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 'लियो' सिनेमाने 'गदर 2'चा (Gadar 2) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. केरळमध्ये रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
'लियो' या सिनेमाची 250 ते 300 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. 'लियो' या सिनेमात थलापती विजय आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या सिनेमात तृषा कृष्णन, अर्जुनसह अनेक कलाकार महात्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. लोकेश कनगराज यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'लियो' हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लियो' हा अॅक्शन, थरार आणि नाट्य असणारा सिनेमा आहे.
'लियो'ने पहिल्या दिवशी केले 'हे' रेकॉर्ड्स
1. 'लियो'ने 2023 मध्ये जगभरात सर्वाधिक ओपनिंग कमाई केली आहे.
2. 2023 मध्ये तामिळनाडूमध्ये 'लियो'ने सर्वाधिक ओपनिंग कमाई केली आहे.
3. कॉलिवूडमध्ये आतापर्यंत 'लियो'ला सर्वात जास्त ओपनिंग मिळाली आहे.
4. केरळमध्ये आतापर्यंत 'लियो'ला सर्वात जास्त ओपनिंग मिळाली आहे.
5. आंध्र प्रदेश आणि तेलंगनामध्ये 2023 मध्ये 'लियो' या सिनेमाला सर्वाधिक ओपनिंग मिळालं आहे.
6. भारतात 'लियो' या कॉलिवूड सिनेमाला मिळालेलं सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन
संबंधित बातम्या