Sanjay Dutt Thalapathy 67 Big Update : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (THalapathy Vijay) 'थलापती 67' (Thalapathy 67) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली असून विजयचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमातील संजय दत्तचा (Sanjay Dutt) फर्स्ट लूक आऊट झाला आहे. 


'थलापती 67' या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 'केजीएफ 2' (KGF 2) या सिनेमानंतरचा 'थलापती 67' हा त्याचा दुसरा सिनेमा आहे. या सिनेमातील त्याला लुक खूपच दमदार आहे. या लुकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या बॅनरखाली 'थलापती 67' (Thalapathy 67) या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचं पोस्टर शेअर करत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत संजय दत्तचं स्वागत केलं आहे. संजय दत्तच्या 'केजीएफ 2' सिनेमातील कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्यामुळे दाक्षिणात्य सिनेरसिकांनी पुन्हा एकदा संजय दत्तच्या अभिनयाची जादू पाहायला मिळणार आहे. 






'थलापती 67' सिनेमासाठी संजय दत्तने किती मानधन घेतलं आहे? 


मीडिया रिपोर्टनुसार, 'थलापती 67' या सिनेमासाठी संजय दत्तने चांगलच मानधन घेतलं आहे. या सिनेमासाठी संजयने 10 कोटी मानधन घेतलं आहे. पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करण्यास संजय दत्त उत्सुक आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर संजय दत्तची प्रतिक्रियादेखील दिली आहे. त्यात लिहिलं आहे,"थलापती 67' या सिनेमाची वन लायनर ऐकल्यानंतर लगेचच मी या सिनेमासाठी होकार दिला. या सिनेमाच्या माध्यमातून नवीन प्रवासाची सुरुवात करण्यास मी उत्सुक आहे". 


'थलापती 67' या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्यासह अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकेश कनगराज सांभाळत आहे. लोकेशने याआधी 'विक्रम' (Vikram) सारख्या सारख्या सुपरहिट सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात विजय थलापती, संजय दत्तसह तृषा, प्रिया आनंद, गौतम मेनन, अर्जुन सरजा आणि मंसूर असी खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Sanjay Dutt On Cancer : "उपचारापेक्षा आयुष्य संपवण आवडलं असतं"; कर्करोगावर मात केलेल्या संजय दत्तचा मोठा खुलासा