मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. 'ठाकरे' सिनेमाने पहिल्या आठवड्यात 31.6 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 6 कोटी रुपयांची कमाई केली होती.


तर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 'ठाकरे'ने 10 कोटी रुपयांची कमाई केली होती. अशारीतीने पहिल्या दोन दिवसातच सिनेमाने 16 कोटींची कमाई केली होती. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या चरित्रावर असलेला कंगना रानौतचा 'मर्णिकर्णिका' आणि 'ठाकरे' सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते.


त्यामुळे ठाकरे सिनेमावर त्याचा परिणाम होईल, अशी शंका केली जात होती. मात्र ती शंका चुकीची ठरली.


'ठाकरे' हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर 'मणिकर्णिका' हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. दोन्ही चित्रपटांच्या दोन दिवसांच्या कमाईचा विचार केला तर 'मणिकर्णिका'ने 'ठाकरे'ला मागे टाकले आहे.


कसा आहे 'ठाकरे' सिनेमा ?




संबंधित बातम्या


'ठाकरे' सिनेमाची थिएटर कॉपी लीक


'ठाकरे' बॉक्स ऑफिसचा 'बाप रे'


Thackeray Vs Manikarnika : कमाईत दुसऱ्या दिवशी कोणाची बाजी?


ठाकरे - झंजावातामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न