Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Suraj Chavan : टीव्ही, फ्रिज, AC ते वॉशिंग मशीन, सूरज चव्हाणवर ह्युंदाईचा वर्षाव, घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू दिल्या!
Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या यंदाचा पाचवा सीझन खूपच गाजला. बिग बॉस मराठी 5 पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी सीझन 5 चा महाअंतिम सोहळा पार पडला. सुरज चव्हाण बिग बॉसचा विजेता ठरला. त्याची साधी बोली आणि साधं राहणीमान, याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि तो यशस्वी झाला. सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
दसऱ्याच्या मुहूर्तावर मनोरंजनाचा धमाका; थिएटरमध्ये प्रदर्शित होणार 'हे' 7 मोठे चित्रपट, नक्की पाहा!
Movies Releasing During Dussehra 2024 In Cinemas: यंदा 12 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हा सण भगवान रामानं रावणासोबत झालेल्या युद्धात मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. दसरा, म्हणजेच विजयादशमीचा दिवस तुम्हाला आणखी खास बनवायचा असेल, तर तुम्ही थिएटरमध्ये प्रदर्शित होणारे 7 चित्रपट नक्की पाहू शकता. अशा परिस्थितीत लोक मोठ्या पडद्यावर या उत्तम चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहत आहेत. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्या 'वेट्टियाँ'पासून ते आलिया भट्टच्या 'जिगरा'पर्यंत, तो या आठवड्यात प्रदर्शित होणारे हे चित्रपट त्याच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत पाहू शकतो.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Happy Birthday Amitabh Bachchan : अमिताभ आणि रेखाचं नातं, 70 च्या दशकातील अधुरी प्रेमकहाणी; कसं आणि कुठे फुललं दोघांचं प्रेम?
Amitabh Bachchan Birthday Special : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. अमिताभ बच्चन आज त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ते अभिनेता बनण्यासाठी कोलकाताहून मुंबईत आले होते. अमिताभ यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रोफेशनल लाइफप्रमाणेच त्यांची पर्सनल लाइफही तितकीच चर्चेत राहिली. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी 70 च्या दशकातील चर्चित प्रेम कहाणींपैकी एक होती, जी पूर्ण होऊ शकली नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Singham Again : 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक
Singham Again Release Date : रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट ट्रेलर अलिकडे रिलीज करण्यात आला आहे. सिंघम अगेन चित्रपट 2024 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. दिग्गज स्टारकास्ट असलेल्या सिंघम अगेन चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लाँच करण्यात आला. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सिंघम अगेनचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सिंघम अगेन चित्रपटाची कहाणी रामायणापासून प्रेरित असल्याचं दिसत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
Bigg Boss Marathi Abhijeet Sawant : बिग बॉसची मानाची ट्रॉफी सूरजकडे, तर अभिजीत सावंतला मिळाली 'लय भारी' ट्रॉफी; पोस्ट करत म्हणाला, "मी तुमचं मन जिंकलं..."
Bigg Boss Marathi Runner-up Abhijeet Sawant : काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. यंदाच्या पर्वाची ट्रॉफी बारमतीचा झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavhan) यानं उंचावली. तर, रनरअप ठरला अभिजीत सावंत (Abhijeet Sawant). बिग बॉसचा रिझल्ट अनाउंस झाल्यानंतर, सोशल मीडियावर अभिजीतसाठी अनेक नेटकरी एकवटले आणि त्यांनी अभिजीतला धीर देण्याचा प्रयत्न केला. विनर कुणीही असो, आमच्यासाठी विनर तूच, तूच खरा जेंटलमन, अभिदा तू संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकलीत... अशा अनेक पोस्ट अभिजीत सावंतसाठी सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. पण, अनेकांच्या मनात अभिजीतला ट्रॉफी उंचावता आली नाही, याची खंत होती. पण अखेर महाराष्ट्राच्या ट्रू जेंटलमनला एक खास ट्रॉफी मिळाली आहे. अभिजीत मानाची ट्रॉफी उंचावू शकला नाही, पण त्यानं एक लय भारी ट्रॉफी उंचावली आहे. ही ट्रॉफी खुद्द बिग बॉस मराठी सीझन 5 चा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुखनं अभिजीतला दिली आहे.