Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Gulabi Sadi : 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला 'गुलाबी साडी'ला; युट्यूबवर मिळाले 70 मिलियन व्ह्यूज


Gulabi Sadi : सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड (Sanju Rathod) त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.त्याचं 'गुलाबी साडी' हे गाणं सोशल मिडीयावर तुफान वायरल झाल आहे. आनंदाची बाब म्हणजे 'गुलाबी साडी' हे मराठी गाणं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकलं आहे. 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला संजू राठोडच्या 'गुलाबी साडी'ला (Gulabi Sadi) मिळाला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'या' पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; तुम्ही पाहिलेत का 'हे' सिनेमे?


Amitabh Bachchan : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 80 आणि 90च्या दशकात चित्रपट हिट होण्यासाठी त्यांचे एकटे नाव पुरेसे होते. मोहब्बतें चित्रपटातून पुनरागमन केल्यानंतर त्यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले जे थोडेसे हटके होते किंवा त्यांच्या व्यक्तिरेखेचा रंग वेगळा होता. नवीन भूमिकांमध्येही अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रतिभेची छाप सोडली. वर्षानुवर्षे, त्याने त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्यचकित केले. त्यांना त्याची ॲक्शन, रोमान्स आणि अँग्री यंग मॅन इमेज आवडली. अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. पण त्यांच्या पाच चित्रपटांनी प्रेक्षकांना चांगलच हलवलं. तिकीट खिडकीवरही मोठा परिणाम झाला. या पाच चित्रपटांमुळे अमिताभ बच्चन यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Richest Indian Youtuber : सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे


Tanmay Bhatt Richest Indian Youtuber : पैसे कमावणं आणि श्रीमंत होणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पैसे कमावण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो. मेहनतीचं यश त्याला मिळतंच. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा अंबानी कुटुंबियांचं नाव घेतलं जातं. पण ओटीटी विश्वात रमणारा एक युट्यूबर मात्र कमाईच्या बाबतीत बड्या-बड्या विनोदवीरांना टक्कर देतो. या युट्यूबरचं नाव तन्मय भट्ट (Tanmay Bhatt) असं आहे. वेल्थ मॅनेजमेंटने आता भारतातील सर्वात महागडा युट्यूबर कोण हे जाहीर केलं आहे. त्यानुसार तन्मय भट्ट हा देशातील सर्वात महागडा युट्यूबर असल्याचं समोर आलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Shah Rukh Khan : शाहरुख खानने 23 वर्षांपूर्वी मुंबईत विकत घेतलाय आलिशान बंगला; जाणून घ्या 'किंग खान'च्या मन्नतबद्दल सर्वकाही


Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. किंग खानच्या (King Khan) प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चित्रपटाप्रमाणे त्याच्या 'मन्नत' (Mannat) या बंगल्याचीदेखील चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मन्नतची एक झलक पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते त्याच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. त्याचा हा बंगला आलिशान आहे. त्यामुळे शाहरुखसह या बंगल्यासंबंधित प्रत्येक अपडेट चाहते उत्सुकतेने जाणून घेत असतात. शाहरुखचा बंगला 'मन्नत' या नावाने लोकप्रिय असला तरी त्याचं खरं नाव मात्र काहीतरी वेगळचं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Bollywood Actress : इंटिमेट सीन्सच्या विरोधात होते आई-वडील, अनेक चित्रपट नाकारले; 'लस्ट स्टोरीज 2' फेम अभिनेत्री म्हणाली,"मला भीती वाटायची"


Mrunal Thakur : छोट्या पडद्याच्या माध्यमातून करिअर सुरू करणाऱ्या अभिनेत्री मृणाल ठाकूरचं (Mrunal Thakur) हिंदी मनोरंजनसृष्टीत मोठं नाव आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूडमध्ये ती अप्रतिम काम करत आहे. मृणालचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. या अभिनेत्रीला रोमँटिक क्वीनचा टॅगही मिळाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की मृणाल ठाकूरला इंटिमेट सीनमुळे अनेक चित्रपट सोडावे लागले होते? इंटिमेट सीन्सच्या विरोधात तिचे आई-वडिल होते. त्यामुळे तिला अनेक प्रोजेक्ट नाकारावे लागले होते. मृणाल ठाकूर शेवटची फॅमिली स्टार या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसली होती. प्रेक्षकांचा या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा