Mrunal Thakur : छोट्या पडद्याच्या माध्यमातून करिअर सुरू करणाऱ्या अभिनेत्री मृणाल ठाकूरचं (Mrunal Thakur) हिंदी मनोरंजनसृष्टीत मोठं नाव आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूडमध्ये ती अप्रतिम काम करत आहे. मृणालचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. या अभिनेत्रीला रोमँटिक क्वीनचा टॅगही मिळाला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की मृणाल ठाकूरला इंटिमेट सीनमुळे अनेक चित्रपट सोडावे लागले होते? इंटिमेट सीन्सच्या विरोधात तिचे आई-वडिल होते. त्यामुळे तिला अनेक प्रोजेक्ट नाकारावे लागले होते. मृणाल ठाकूर शेवटची फॅमिली स्टार या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसली होती. प्रेक्षकांचा या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
रोमँटिक सीन्स करताना मी कम्फर्टेबल नव्हते : मृणाल ठाकूर
iDiva ला दिलेल्या एका मुलाखतीत मृणाल म्हणाली, 'मी इंटिमेट सीन, रोमँटिक सीन करण्यात कंफर्टेबल नव्हते. मला खूप भीती वाटायची. त्यामुळे मी त्या चित्रपटांना नकार द्यायचे. पण किती दिवस नाकारणार? एक वेळ अशी आली होती की मला माझ्या आई-वडिलांना बसवून सांगावे लागले होते - 'पप्पा, मी हा भाग चुकवू शकत नाही कारण कधी कधी त्यात असे घडते, ती माझी निवड नाही.'
'या' कारणाने चित्रपट सोडावे लागले...
मृणाल पुढे म्हणाली, 'मला एक चित्रपट करायचा होता पण मला तो सोडावा लागला कारण त्यात किसिंग सीन होता. एक कलाकार म्हणून तुम्हाला तयार राहावे लागते कारण काहीवेळा दृश्याची मागणी असते. तुम्हाला कंफर्टेबल नसेल तर सांगू शकता, पण यामुळे मी चित्रपट गमावले.
आई-वडिलांची साथ नव्हती
अभिनेत्रीने सांगितले की, सुरुवातीला तिचे आई-वडील तिला चित्रपट करण्यास आणि कॉलेज सोडण्यास समर्थन देत नव्हते. जेव्हा तिला पहिल्या मालिकेची ऑफर मिळाली आणि तिने वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी ते मान्य केले नाही. मृणालला कॉलेज आणि काम या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं होतं, पुढे घरच्यांनी मालिकेवरच पूर्ण लक्ष केंद्रित करायला सांगितलं.
मृणाल शेवटची विजय देवरकोंडासोबत फॅमिली स्टार या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. आता पूजा मेरी जान हा चित्रपट मृणालच्या हातात आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. मृणाल सीता रामम, हे नन्ना, जर्सी, लस्ट स्टोरीज 2, सुपर 30, गुमराह यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.
संबंधित बातम्या