Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Kiran Mane Exclusive : सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय असताना ठाकरेंची शिवसेना का निवडली? रोखठोक किरण मानेंची बेधडक उत्तरे


Kiran Mane : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे अभिनेते, 'सातारचा बच्चन' म्हणून 'बिग बॉस' (Bigg Boss) गाजवणारे किरण माने (Kiran Mane) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण आता समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) गटात प्रवेश केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Animal Ticket Price : 100 रुपयात बघा रणबीरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट; कसे बुक करायचे तिकीट? जाणून घ्या


Animal Ticket Price: अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir kapoor) 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट  रिलीज होऊन महिना उलटला तरी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ दिसत आहे. अशातच 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी चित्रपटाच्या तिकीट दरावर खास ऑफर ठेवली आहे.  ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा तिकिट दर  कमी करण्यात आला आहे. रणबीर कपूरचा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये 100 रुपयात बघता येणार आहे. 100 रुपयात अ‍ॅनिमल चित्रपट पाहण्यासाठी कसं तिकीट बुक करावं लागेल? याबाबत जाणून घेऊयात...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aarya 3 : शेरनी येतेय... सुष्मिता सेनच्या 'आर्या 3'चा दमदार टीझर आऊट! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येणार सीरिज


Sushmita Sen Aarya 3 Teaser Out : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा ओटीटी (OTT) विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. सुष्मिताची 'आर्या 3' (Aarya 3) ही बहुप्रतीक्षित सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा दमदार टीझर समोर आला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Devara Teaser Out : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'चा टीझर आऊट; अभिनेत्याच्या दबंग अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मन


Devara : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (JR NTR) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'देवरा' (Devara) या सिनेमामुळे चर्चेत आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर आऊट झाला आहेय टीझरमधील अभिनेत्याच्या दबंग अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ranbir Kapoor : 'Animal'च्या ट्रोलिंगवर रणबीर कपूरची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला,"बॉक्स ऑफिसवरच्या कमाईने दाखवून दिलं"


Ranbir Kapoor on Animal Trolling : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. एकीकडे जगभरात कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र या सिनेमाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. आता बॉक्स ऑफिसवरच्या कमाईने दाखवून दिलं, असं म्हणत रणबीर कपूरने 'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंगवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा