Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit) सध्या चर्चेत आहेत. अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असलेल्या तेजस्विनी पंडीतने आता निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. तेजस्विनी पंडीतचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. दरम्यान अभिनेत्रीच्या एका वक्तव्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चॉकलेट बॉय अंकुश चौधरी (Ankush Choudhary) हा तेजस्विनीचा क्रश होता. 


'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या क्रशबद्दल बोलताना तेजस्विनी पंडीत म्हणाली,"अंकुश चौधरी माझा क्रश होता. अखेर त्याच्यासोबत काम करायची मला संधी मिळाली. एका जाहिरातीत मी त्यांच्यासोबत काम केलं. जाहिरातीसाठी 30-36 मुलींनी ऑडिशन दिली होती. त्यातून माझी निवड झाली आणि मला अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करता आलं. त्यावेळी माझ्याकडे असलेल्या टोपीवर मी त्यांची सही घेतली होती. अनेक दिवस मी ती टोपी मिरवली होती". 


तेजस्विनी पंडीतचं नाव अनेकदा संजय जाधवसोबत (Sanjay Jadhav) जोडलं जातं. तेजस्विनी पंडीत आणि संजय जाधव रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. याबद्दल बोलताना तेजस्विनी पंडीत म्हणाली,"संजय जाधवला मी दादा म्हणते..खरंतर इथेच सगळं संपलं. मला उत्तर देण्याची गरज नाही. आपल्याला माहिती असतं की समोरची व्यक्ती बाबारुपी किंवा दादारुपी आहे तेव्हा मनात वेगळे विचार येत नाहीत. 


भूमिका ब्रेक करण्यासाठी लागला ब्रेक


'अगं बाई अरेच्चा' या सिनेमाच्या माध्यमातून तेजस्विनीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक सिनेमांत, मालिकांमध्ये काम केलं. तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. सिंधुताईंची भूमिका केल्यानंतर मला तशापद्धतीच्या भूमिकेसाठीच विचारणा होत राहिली. पण मला पुन्हा त्या भूमिका करायच्या नव्हत्या. त्यामुळे मी त्या भूमिका नाकारल्या, असं तेजस्विनी पंडीत म्हणाली.


तेजस्विनी पंडीतबद्दल जाणून घ्या... (Who is Tejaswini Pandit)


तेजस्विनी पंडीत एक अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच. पण आता निर्मिती क्षेत्रातही तिने पदार्पण केलं आहे. 'बांबू' हा निर्मिती म्हणून तिचा पहिला सिनेमा आहे. तसेच 'अथांग' या वेबसीरिजची निर्मितीही तिने केली आहे. 'तू ही रे','येरे येरे पैसा','अगं बाई अरेच्चा' आणि 'फॉरेनची पाटलीण' अशा अनेक सिनेमांत तेजस्विनी पंडीतची झलक पाहायला मिळाली आहे. तेजस्विनीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Tejaswini Pandit : मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घालावी का? तेजस्विनी पंडीत म्हणाली,"स्विमिंग पूलमध्ये घालणार नाही मग कुठे?"