Captain Miller Teaser Out : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट झाला आहे. धनुषने टीझर शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


'कॅप्टन मिलर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अरुण मथेस्वरनने केलं आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 1930-40 या काळावर भाष्य करणारे या सिनेमाचे कथानक आहे. या सिनेमात धनुष बायकरचे पात्र साकारताना दिसणार आहे. 


सध्या हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा पाहायला मिळणार आहे. यशचा 'केजीएफ', ज्यूनिअर एनटीआरचा 'आरआरआर' आणि अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' या दाक्षिणात्य सिनेमांनी गेल्या काही दिवसांत चांगलाच धुमाकूळ घातला. दुसरीकडे धनुष अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. धनुषचे 'करनन' आणि 'असुरन' हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या सिनेमात धनुषचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 






दिग्दर्शक अरुण मथेस्वर म्हणाले...


'कॅप्टन मिलर' या सिनेमाचे दिग्दर्शक अरुण म्हणाले, 'कॅप्टन मिलर' या सिनेमाचे या सिनेमाचे शूटिंग लाईव्ह लोकेशनवर करण्यात आले आहे. या सिनेमाचे शूटिंग तामिळ भाषेत झाले असले तरी हा सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. विदेशातदेखील हा सिनेमा प३दर्शित होऊ शकतो. हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


संबंधित बातम्या


Rashtra Kavach Om Box Office Collection : आदित्य रॉय कपूरच्या 'राष्ट्र कवच ओम'नं दुसऱ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन


Jug Jugg Jeeyo Box Office : 'जुग जुग जियो'चा विकेंड धमाका; पार केला 100 कोटींचा टप्पा