Rashtra Kavach Om Box Office Collection : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या (Aditya Roy Kapur) राष्ट्र कवच ओम (Rashtra Kavach Om) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. एक जुलै रोजी हा चित्रपट रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.51 कोटींची कमाई केली. तर आता दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली आहे. पाहूयात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...


ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या ट्वीटनुसार राष्ट्र कवच ओम या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 1.70  कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच पहिल्या दिवसापेक्षा 20 लाख जास्त कमाई या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली. या चित्रपटानं दोन दिवसांमध्ये 3.21 कोटींची कमाई केलेली आहे. 


क्रिटिक्सकडून या चित्रपटाबाबत चांगली प्रतिक्रिया मिळत नाहीये. त्याचा परिणाम राष्ट्र कवच ओम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होत आहे. अॅक्शन, ड्रामा, थ्रिल हे प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. आदित्यसोबतच या चित्रपटामध्ये संजना सांघवी, जॅकी श्रॉफ आणि प्रकाश राज यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. कपिल वर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.  अहमद खान, शेरा खान आणि झी स्टूडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.






आदित्य रॉय कपूरचा व्हिलन-2 हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा लूडो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  ओके जानू, दावत ए इश्क आणि फितूर हे आदित्यचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकी-2 या चित्रपटामधून आदित्यनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.


हेही वाचा: