37 सेकंदांच्या या टीझरमध्ये रांझना स्टार धनुष आणि रघुवरन यांचा रांगडा अवतार पाहायला मिळत आहे. धनुषची अॅक्रोबॅट कीक टीझरमधील सर्वात लक्षवेधी आहे. मात्र काजोलची झलक चाहत्यांना पाहायला मिळत नाही.
काजोल या चित्रपटात खलनायिकेच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. दोन दशकांनंतर काजोल कॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. अरविंद स्वामीच्या 'मिनसारा कनवू'मध्ये यापूर्वी ती झळकली होती.
व्हीआयपी 2 च्या टीझरमध्ये काजोल नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिची व्यक्तिरेखा गुलदस्त्यात ठेवण्यासाठी निर्मात्यांनी तिचं दर्शन घडवलं नाही, की तिला डावललं गेलं, याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.
व्हीआयपी 2 च्या टीझरला 24 तासात टीझरला 18 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तमिळ आणि तेलगू भाषेत टीझर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद धनुषचे असून सौंदर्या रजनीकांतने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 28 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पाहा व्हिडिओ :