Taylor Swift AI Deepfakes: गेल्या काही दिवसांपासून डीपफेक व्हिडीओच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna),कतरिना कैफ (Katrina Kaif), नोरा फतेही (Nora Fatehi) यांचे डीपफेक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले आहेत. आता प्रसिद्ध अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टचा देखील आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा फोटो AI च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. हा फोटो ट्विटर म्हणजेच X वर शेअर करण्यात आला होता. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk)  यांनी हे फोटो X वरुन हटवले आहेत.


X वर टेलर स्विफ्टचे आक्षेपार्ह फोटो करण्यात आले शेअर


ट्विटर म्हणजेच X वर टेलर स्विफ्टचे आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यात आले. रिपोर्टनुसार, 4.5 कोटी लोकांनी हा फोटो पाहिला तर 24,000 हून अधिक लोकांनी हा पोस्ट रिपोस्ट केला. या फोटोला हजारो लाइक्स मिळाले. मात्र, युजर्सच्या तक्रारीनंतर या फोटोला आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून हटवण्यात आल्या आहेत.


एलॉन मस्क यांनी उचललं पाऊल
 


टेलर स्विफ्टचे फोटो समोर आल्यानंतर, 'Taylor Swift AI' हा हॅशटॅग X वर ट्रेंड होऊ लागला.एलॉन मस्क यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन टेलर स्विफ्टचा आक्षेपार्ह फोटो काढून टाकला. एलॉन मस्क यांनी आणखी एक पाऊल उचलले. आता X म्हणजेच ट्विटरवर तुम्ही 'टेलर स्विफ्ट' सर्च केलं तर तुम्हाला काहीही दिसणार नाही.तुम्ही ‘टेलर स्विफ्ट एआय’ टाइप करून सर्च केले तरी तुम्हाला स्क्रिनवर काहीही दिसणार नाही. X ने अशा शब्दांवर बंदी घातली आहे, जेणेकरून टेलर स्विफ्टचे आक्षेपार्ह फोटो कोणालाही दिसू नयेत.


X मधून निवडलेल्या शब्दांवर बंदी घालणे खरोखरच एलॉन मस्क  यांचे एक मोठे पाऊल आहे. असे शब्द लिहून एआयच्या गैरवापराची बळी ठरलेल्या टेलर स्विफ्टचा व्हायरल झालेला फोटो कोणालाही बघता येणार नाही. मात्र, तुम्ही फक्त 'टेलर' किंवा 'स्विफ्ट' टाइप केल्यास, टेलर स्विफ्टशी संबंधित पोस्ट सर्चमध्ये दिसतील.


अमेरिकन गायक टेलर स्विफ्टचे चाहते जगभर पसरलेले आहेत. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Rashmika Mandanna: "हे भीतीदायक आहे, मी महिलांना आवाहन करू इच्छिते की..."; डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत बोलली रश्मिका