Dani Li: ब्राझिलियन गायिका दानी लीचे  (Dani Li)  वयाच्या 42 व्या वर्षी निधन  झाले आहे. दानी लीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दानी लीनं काही दिवसांपूर्वी लिपोसक्शन सर्जरी केली होती, त्यानंतर तिला काही समस्या जाणवायला लागल्या होत्या. पण दानी लीच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर


दानी लीच्या निधनानंतर तिच्या पतीला प्रचंड धक्का बसला आहे. दानी लीला सात वर्षांची मुलगीही आहे. दानीच्या कुटुंबीयांनी इंस्टाग्रामवर एका निवेदनाद्वारे शोक व्यक्त केला आहे. तसेच दानी लीच्या सर्व चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.


लिपोसक्शन शस्त्रक्रिया म्हणजे काय?


लिपोसक्शन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीरातील मुख्य अवयवातून अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते. हे मुळात लठ्ठपणा कमी करण्यासाठी केलं जातं.शस्त्रक्रियाच्या माध्यमातून चेहरा, कंबर, छाती, मान आणि हनुवटी यासारख्या भागांवरील अतिरिक्त चरबी काढून टाकून स्लिम लुक दिला जातो.


लिपोसक्शन शस्त्रक्रियेनंतर दानी ली तिच्या स्तनांचा आकार कमी करण्यासाठी शस्त्रक्रियाही करणार होती. पण तिला लिपोसक्शन सर्जरीनंतर तिला समस्या जाणवू लागल्या. तिचा खूप त्रास जाणवायला लागला होता, त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


जाणून घ्या दानी लीबद्दल...



दानी ली ही ब्राझिलियन संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध गायिका होती. तिचे पूर्ण नाव डॅनियल फोन्सेका मचाडो होते. Eu sou da Amazonia म्हणजेच I am from the Amazon या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. दानीला बालपणापासूनच गायनाची आवड होती.






गेल्या काही वर्षांत शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या समस्यांमुळे अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. कन्नड अभिनेत्री चेतनाचे  2022 मध्ये अचानक निधन झाले. तिच्यावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. चेतनाच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, शस्त्रक्रियेपूर्वी तिची संमती विचारण्यात आली नव्हती.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास