Tamil Actor Vishal Talks On Corruption: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विशाल (Vishal) हा  त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो.  विशालनं  'मार्क अँटनी' (Mark Antony) नावाच्या चित्रपटामध्ये काम केले. विशालचा हा चित्रपट रविचंद्रन यांनी दिग्दर्शित केला होता. सध्या विशाल हा त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओच्या माध्यामतून विशालनं सेन्सॉर बोर्डावर काही गंभीर आरोप केले आहेत. विशालनं व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टॅग देखील केलं आहे.


विशालनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो भ्रष्टाचाराबाबत बोलत आहे.  या व्हिडीओला विशालनं कॅप्शन दिलं, "भ्रष्टाचार हा रुपेरी पडद्यावर दाखवला जात असेल तर ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात नाही. तो पचवता येत नाही. विशेषतः सरकारी कार्यालयात आणि याहून वाईट हे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या मुंबई कार्यालयात घडत आहे. माझ्या मार्क अँटनी (हिंदी व्हर्जन) या चित्रपटासाठी मला 6.5 लाख मोजावे लागले. 2  Transactions, स्क्रीनिंगसाठी 3 लाख आणि प्रमाणपत्रासाठी 3.5 लाख. माझ्या कारकिर्दीत मी कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नाही. आज चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून संबंधित मध्यस्थांना खूप पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता. हे मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या निदर्शनास आणून देत आहे."


"हे मी माझ्यासाठी नाही तर भविष्यातील निर्मात्यांसाठी करत आहे. माझ्या कष्टाचा पैसा भ्रष्टाचारासाठी गेला?  मी पुरावा  देखील देत आहे. आशा आहे की, नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल." असंही विशालनं कॅप्शनमध्ये लिहिलं.






विशालचा मार्क अँटनी हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. हा एक  अॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये विशालसोबतच एसजे सूर्याने देखील काम केले. आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Vijay Antony: "जात, धर्म, पैसा, वेदना..."; लेकीच्या निधनानंतर अभिनेता विजय अँटोनीनं व्यक्त केल्या भावना