Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाचं वजन वाढलं? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'WWE मध्ये एन्ट्री पक्की'
जयदीप मेढे | 16 Nov 2024 11:55 PM (IST)
Tamannaah Bhatia Weight Gain : अभिनेत्री तमन्ना भाटियाचा बॅकलेस ड्रेसमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Tamannaah Bhatia Weight Gain Video Viral Netizens Trolled Actress
Tamannaah Bhatia Viral Video : बॉलिवूड अन् साऊथमधील सुपरस्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. अलिकडे तमन्ना भाटिया स्त्री 2 चित्रपटातील आयटम साँगमुळे चर्चेत आली होती. या चित्रपटातील 'आज की रात' या गाण्यामुळे तमन्ना भाटियाने सर्व लाईमलाईट स्वत:कडे खेचली. या आटटम साँगमध्ये तमन्नाने तिचा सिझलिंग लूक आणि घायाळ करणाऱ्या अदांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. तमन्ना भाटिया फिटनेस आयकॉन आणि स्टायलिश स्टार आहे. तिची फॅशन कायम चर्चेत असते. वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल प्रत्येक लूक तिच्यावर खुलून दिसतो, तिच्या प्रत्येक लूकमुळे चर्चेत असते. चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीत. पण, आता मात्र, तमन्नाच्या लूकमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटियाचं वजन वाढलं?
अभिनेत्री तमन्ना भाटियाचा (Tamannaah Bhatia) एक नवीन व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. तमन्नाचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेहमी सिझलिंग आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असणारी तमन्ना सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार झाली आहे. तमन्नाचा एक लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती कटआऊट बॅकलेस टॉप आणि जीन्समध्ये दिसत आहे. पापाराझी तिचा लूक कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात व्यस्त असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी तमन्नाही मीडियाला पाहताच कॅमेऱ्यासमोर पोझ देते. ह्या व्हिडीओमुळे तमन्ना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
वाढलेल्या वजनामुळे तमन्ना भाटिया ट्रोल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ती कटआउट ड्रेसमध्ये दिसत आहे. पण, या व्हिडीओमध्ये तमन्ना भाटियाचं वजन थोडंस वाढलेलं असल्याचं दिसत आहे. कटआउट बॅकलेस टॉप आणि ब्लॅक जीन्स अशा स्टायलिश लूकमध्ये तमन्ना दिसत आहे. हातात घड्याळ आणि गोल्डन स्लीक नेकलेसने तिने हा लूक कंप्लिट केला आहे. मिडल पार्टेड हेअर स्टाइल आणि न्यूड मेकअपसह ती खूप स्टायलिश दिसत आहे. तिने ब्लॅक हिल्सही घातलेले दिसत आहेत.
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, ती खूप लठ्ठ दिसत आहे. एका यूजरने सांगितलंय की, शरीर रचनेनुसार ड्रेसिंग खूपच खराब आहे. बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे. आणखी एकाने लिहिलंय, तिचा जिम ट्रेनर त्याला WWE मध्ये घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं. एकाने लिहिलंय, WWE मध्ये एन्ट्री पक्की. तिच्या लूकवर चाहते अशा प्रकारच्या कमेंट करत आहेत. मात्र, काही चाहते तिच्या समर्थनात पुढे आले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, तमन्ना प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. दुसऱ्य़ाने लिहिलंय, "तमन्ना 70 च्या दशकातील अभिनेत्रीसारखी दिसते. ती लठ्ठ झाली आहे, पण तमन्ना अजूनही सुंदर आहे".