तैमूर अली खान पतौडी, सैफीनाच्या मुलाच्या नावाची चर्चा का?
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 06:02 PM (IST)
मुंबई : अभिनेत्री करीना कपूरने आज मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं हे पहिलं अपत्य आहे. या दाम्पत्याने मुलाचं नामकरण तैमूर अली खान पतौडी केलं आहे. पण सैफीनाच्या चाहत्यांना तैमूर अली खान हे नाव फारसं पसंत पडलेलं नाही. पतौडी कुटुंबाचं नाव आणि वंश चालवण्याच्या उद्देशाने हे नाव ठेवल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर करीना आणि सैफच्या नाव पाहता त्यांच्या मुलाचं नाव शोभत नाही. सामान्य भारतीयांच्या मतानुसार, तैमूर एक क्रूर राज्यकर्ता होता. त्याने सामान्य भारतीयांवर अत्याचार करुन सत्ता मिळवली होती. यामुळे अनेकांना तैमूर अली खान हे नाव फार आवडलं नाही.