केरळमधील लहान मुलांची खेळणी तयार करणाऱ्या एका कंपनीने तैमूरचा हुबेहूब बाहुला तयार केला आहे. अर्थात हे तैमूरचं 'अनधिकृत वर्जन' आहे, म्हणजेच करिना किंवा सैफकडून यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही.
या बाहुल्यांचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. नेव्ही ब्लू रंगाचं जॅकेट, पांढरा कुर्ता आणि निळी पँट असा तैमूरचा वेष आहे.
येत्या 20 डिसेंबरला तैमूर दोन वर्षांचा होईल. गेल्या वर्षी पतौडी कुटुंबाने त्यांच्या पूर्वापार घरात वाढदिवस साजरा केला होता. तैमूरचे असंख्य चाहते असून त्याच्या नावाने फेसबुक-इन्स्टाग्रामवर फॅन पेजेस सुरु आहेत.