Vijay Varma on Boycott : सध्या बॉलिवूडमध्ये ‘बॉयकॉट’चे वारे वाहत आहेत. अगदी बड्या कलाकारांचे बिग बजेट चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटत आहेत. मागील काही काळापासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. या बॉयकॉटचा धसका कलाकारांनी देखील घायला सुरुवात केलीये. कुणी प्रेक्षकांना विनंती करत आहेत, तर कुणी संतापलं आहे. अनेक कलाकारांनी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ‘डार्लिंग्स’ (Darlings) फेम अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) याने देखील बॉलिवूडच्या बॉयकॉट ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रदर्शित होणाऱ्या सर्व बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सध्या सुरु झाला आहे. बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला जात असून, त्याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिसवर होत आहे. आतापर्यंत प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांनाही याचा फटका बसला आहे. अभिनेता विजय वर्मा याने देखील आपला संताप व्यक्त केला असून, ‘आता पाणी डोक्यावरून जाऊ लागलं आहे’, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
काय म्हणाला विजय वर्मा?
यावर प्रतिकिया देताना विजय म्हणाला की, ‘वर्षानुवर्षे जुन्या गोष्टींमुळे आता तुमच्यावर बहिष्कार टाकला जाऊ शकत नाही.’ उदाहरण देताना अभिनेता पुढे म्हणाला, 'मी राजस्थानमध्ये एका घरात गेलो होतो, तिथे बिबट्या आणि वाघांची कातडी होती. जेव्हा ते घर बांधले गेले, तेव्हा मेलेल्या प्राण्यांची कातडी प्रदर्शनात ठेवण्याची प्रथा होती. आपल्याला आता वाटते की, प्राण्यांना मारणं किती धोकादायक आणि क्रूर आहे. परंतु, त्या काळातील लोक ज्यांनी या प्राण्यांच्या चार पिढ्या मारल्या. मात्र, नंतर त्यांच्यात सुधारणा झाली. त्यांना आता आपण नाकारू शकतो का?
विजय म्हणाला, ‘आता पाणी डोक्यावरून जात आहे. मला वाटतं तुम्ही 10 वर्षांपूर्वी काही बोलला असाल, तर त्या वेळी काही लोकांनी आक्षेप घेतला असू शकतो. तो त्या काळी प्रचलित ट्रेंड असू शकतो. परंतु, आता त्याचा विचार केला जाऊ शकत नाही.’
अर्जुनने देखील व्यक्त केला संताप!
यासंदर्भात बोलताना अर्जुन कपूर देखील म्हणाला होता की, 'आपण सर्वांनी याबाबत शांत राहून चूक केली आहे. यावर शांत राहून प्रत्येकजण स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावत काम करत होता, त्याचाच गैरफायदा घेऊ लागले आहेत. इंडस्ट्रीतील लोकांना वाटते की, त्यांचे काम त्यांच्यासाठी बोलेल. मात्र, आता ट्रोल करणाऱ्यांना याची सवय लागली आहे.’
हेही वाचा :