मुंबई : तापसी पन्नू (Taapsee Pannu)दक्षिणेमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2013 साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला चित्रपट रोमॅंटिक, कॉमेडी जॉनरचा होता. पण हळूहळू तिने तिच्या प्रत्येक चित्रपटातून आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले. मग तो पिंक (Pink) चित्रपट असो किंवा थप्पड (Thappad).प्रत्येक चित्रपटातून तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता तिला गंभीर चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी निवडले जाऊ लागले आहे.
पात्र आपलसं करते तापसी पन्नू
तापसी पन्नूची हीच खासियत आहे की, तिला जे पात्र साकार करायला दिले जाते ते पात्र ती आपलेसे करते. तिच्या नावाजलेल्या चित्रपटांत बेबी, नाम शबाना, पिंक, थप्पड, बदला, सांड की ऑंख, मनमर्जिया आणि गाजी अटॅक सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/sWsw8yfzPpc" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>
यावर्षात तापसी पन्नूचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आहेत तयार
हे वर्ष तापसी पन्नूसाठी खास असणार आहे. कारण तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत. यातील जास्त चित्रपट हे स्त्रीवादी आहेत. शाबास मिथू हा चित्रपट महिला क्रिकेट टीमची पूर्वीची कॅप्टन मिथाली राजवर आधारित आहे. त्यात तापसी मुख्य भूमिका साकारणार आहे. रश्मि रॉकेट चित्रपटात ती एका महिला खेळाडूची भूमिका करत आहे. हसीन दिलरूबा हा एक रोमांचक चित्रपट असून त्यावर अनेक चर्चा होताना दिसून येतात. तापसी फक्त गंभीर चित्रपट करत नसून ती वेगवेगळ्या जॉनरचेही चित्रपट करत असते. याचेच उदाहरण म्हणजे त्या सगळ्या गंभीर चित्रपटातून बाहेर पडत ती लूप लपेटा या विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांना हसवणार आहे. म्हणजेच तापसीचे सर्व चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत तिच्या प्रत्येक चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.