Swatantra Veer savarkar Randeep Hooda Diet Plan : यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रणदीप हुड्डाने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपने बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही केले. त्याचा फोटो त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. रणदीपने काही दिवसांमध्येच आपले वजन 26 किलोंनी कमी केले होते. नेमकं डाएट प्लान कसा होता?
काही दिवसात घटवला 26 किलो वजन
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 18 मार्च 2024 रोजी रणदीप हुड्डाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर 'काला पानी' अशी कॅप्शन देत एक मिरर सेल्फी पोस्ट केला होता. सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल झाला. रणदीपचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काही नेटकऱ्यांनी रणदीप हुड्डाने वजन कमी करण्यासाठी फक्त दूधच पित होता असे म्हटले. तर, अन्य काही युजर्सने डाएटचे कठोरपणे पालन केल्याने रणदीपला वजन घटवणे शक्य झाल्याचे म्हटले जाते.
एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना रणदीपने आपला डाएट प्लान उघड केला. रणदीपने म्हटले की, माझा डाएट प्लान सांगितल्यावर काहीजण कॉपी करतील अशी भीती आहे. मी फक्त दूध आणि खजूरच खात नव्हतो. हे धोकादायक ठरू शकते, आरोग्याला अपाय होऊ शकतो. त्यामुळे त्याला फॉलो करू नका असेही रणदीपने म्हटले.
रणदीप हुड्डाचा डाएट प्लान काय होता?
रणदीपची बहीण अंजली हुड्डा ही एक डॉक्टर आहे. तिच्या मदतीने रणदीपने चित्रपटासाठी वजन घटवले.रणदीपने सांगितले की, त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी पॅलिओ डाएट तयार केला. फिजीकल ट्रान्सफॉर्मेशनमधील अनेक टप्प्यात अंडी, खजूर, नट्स आणि इतकंच नव्हे तर डार्क चॉकलेटदेखील खावं लागले. रणदीपने आपल्या डाएट दरम्यान उपवासही केला आणि व्हिटॅमिनचे डोस घेतले. पाच दिवसांच्या अंतरात रणदीपचे वजन 6 ते 7 किलोंनी कमी झाले.
आधीच्या व्यक्तीरेखांसाठी रणदीपने केलंय बॉड्री ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरबजीत'साठी त्याने 20 किलो वजन घटवले होते. त्याचवर्षी प्रदर्शित झालेल्या 'दो लफ्जो की कहानी' या चित्रपटात त्याने आपले वजन 77 किलोहून 94 किलोपर्यंत वाढवले होते.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. वजन वाढवण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )