Tejaswini Pandit :  अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर आपली राजकीय-सामाजिक मुद्यावरील भूमिका मांडत असते. आता तिने केलेल्या एका ट्वीटमुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. तेजस्विनीने पुरंदरचा तह... पण राजावर विश्वास...कायम! असे ट्वीट करत शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहाचे विश्लेष्ण करणाऱ्या लेखाचा एक भाग पोस्ट केला आहे. यावरून नेटकऱ्यांनी या पोस्टचा संबंध मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी जोडत छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाशी तुलना कशाला असा सवाल केला आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री आणि  भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेदेखील महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर गुरुवारी मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत राज ठाकरे देखील सहभागी झाले होते. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर मतमतांतरे व्यक्त होऊ लागली. त्यातच तेस्विनीने केलेल्या ट्वीटची चर्चा होऊ लागली. 



तेजस्विनी पंडितमध्ये ट्वीट काय म्हटले?


तेजस्विनीने केलेल्या ट्वीटमध्ये  म्हटले की, ''या तहामुळे स्वराज्याचे तात्कालिक नुकसान नक्कीच झाले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबाकडून कैद देखील झाली होती पण हा तह करताना शिवाजी महाराजांनी बरीच मोठी दूरदृष्टी दाखवली होती. जे २३ किल्ले तहामध्ये द्यायचे ठरले होते ते मुळतः मोगलांचेच किल्ले होते. तोरणा, राजगड, शिवनेरी सारखे महत्त्वाचे किल्ले शिवाजी महाराजांना राखून ठेवण्यात यश आले होते. या तहामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल थांबले होते. आग्रा येथील कैदेतून सुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी परत एक एक किल्ला जिंकण्यास सुरुवात केली. हा तह १३ जून १६६५ रोजी झाला होता. आणि तह झाल्यानंतर महाराजांकडे १२ किल्ले उरले होते. पण पुढील १५ वर्षात म्हणजेच १६८० पर्यंत शिवाजी महाराजांकडे तब्बल २०० किल्ले होते. हा तह जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच सामान्य माणसाला प्रेरणादायी पण आहे. बरेच वेळेस प्रचंड संघर्ष करून यशाचे शिखर गाठल्यावर तिथूनही माघार घेण्याची वेळ आयुष्यात अनेक जणावर येते पण अशी वेळ आल्यावर खचून न जाता परत कसे उभा राहायचे हे शिवाजी महाराजांकडून आणि या तहातून शिकायला मिळते. काही वेळेस स्वीकारलेली तात्कालिक माघार दूरदृष्टीचा विचार करता किती महत्त्वाची असते ही गोष्ट पण पुरंदरचा तह शिकवतो. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे तो याच कारणामुळे. या तहाच्या मूळ प्रती आजही राजस्थानातील बिकानेर येथील संग्रहालयात उपलब्ध आहेत.


नेटकरी संतापले


नेटकऱ्यांनी तेजस्विनीच्या पोस्टचा संबंध राज ठाकरे यांच्याशी लावला. यावरून नेटकऱ्यांनी तेजस्विनीवर टीका केली आहे. नाही पटलं… तुलना कोणासोबत ? 
तह नाही, ह्याला नांगी टाकणे म्हणतात  असे एका युजरने म्हटले. 






अहो ताई तुमच्या साहेबांच्या राजकारनाला आमच्या राज्याच्या निर्णय सोबत compare करू नका कुठे ते 1-2 लोकसभा जागेसाठी दिल्लीपुढे लोटांगण घालणारे तुमचे साहेब आणि कुठे शिवछत्रपती, असेही एका युजरने म्हटले. 






ईडी घुसली तिथ काय तह आणि प्रत्येक गोष्टीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दाखले देणं बंद करा.माझ्या राजाने कोणाला लुबाडून खाल्लं नव्हतं.जेवढे आजकाल सत्तेत जात आहेत असेही एकाने म्हटले. तुलना कोणा सोबत करायची याची तरी लाज राखा असेही एकाने म्हटले.