LSD 2 Leak Scene : दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'LSD 2' या सिनेमाचं सध्या शुटींग सुरु आहे. पण रिलीजसाठी सज्जा होण्याआधीच या सिनेमाच्या अडचणी दिवसागणिक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. आधी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात अनेक कट सुचवले. त्यानंतर आता या चित्रपटातील अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीचा (Swastika Mukharjee) एक इंटिमेट सीन लीक झाला आहे. दरम्यान हा इंटिमेट सीन अत्यंत चुकीच्या पद्धतीने लीक झाल्यामुळे अभिनेत्री देखील चिंतेत असल्याचं म्हटलं जात आहे. 


इंटरनेटवर लीक झालेल्या या सीनमध्ये स्वस्तिका देखील दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर असून अनेक अकाऊंट्स तो शेअर करत आहेत. दरम्यान सिनेमाच्या टीमकडून हा सीन कसा लीक झाला याचा शोध सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. LSD 2 या चित्रपटात बोनिता राजपुरोहित आणि अभिनव सिंग मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत मौनी रॉय, उर्फी जावेद, तुषार आणि अनु मलिक हे कॅमिओमध्ये आहेत. 


स्वस्तिका मुखर्जीचा इंटिमेट सीन लीक


सुरुवातीला जेव्हा हा इंटिमेट सीन लीक झाला तेव्हा स्वस्तिका मुखर्जीचा खासगी आयुष्यातला हा व्हिडिओ असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्यानंतर हा व्हिडिओ 'एलएसडी 2' या चित्रपटातील लीक सीन असल्याचं समोर आलं. त्यामुळे चित्रपटातील एक सीन लीक झाल्याचं यावरुन स्पष्ट झालं. 






'एलएसडी 2' चा टीझर आऊट


'एलएसडी 2' च्या या टीझरमध्ये रिएलिटी शो, त्यातील नाट्य, सेक्स, अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत.'एलएसडी 2'च्या टीझरमध्ये  डिजीटल काळातील लव्ह स्टोरी आहे. सध्याच्या पिढीतील मुल कशा पद्धतीने कोणताही विचार न करता प्रेमात कोणत्या पातळीपर्यंत उतरतात, त्यावर भाष्य करण्यात आले आहे. या टीझरमध्ये  उर्फी जावेदची झलक दिसून येते.   


'लव्ह सेक्स और धोखा 2' या सिनेमात उर्फी जावेदसह 'बिग बॉस 16' फेम निमृत कौर अहलूवालियादेखील दिसणार आहे. 2010 मध्ये आलेल्या 'LSD' या सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे.         


ही बातमी वाचा : 


Ravi Kishan : महिलेच्या गंभीर आरोपांमुळे भाजपचे रवी किशन अडचणीत, 25 वर्षांच्या मुलीचे पालकत्त्व स्वीकारण्याची मागणी