Salman Rushdie, Swara Bhasker : सुप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या या हल्ल्यात हल्लेखोराने सलमान रश्दी यांच्यावर चाकूने अनेक वार केले गेले. हल्लेखोराला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. आता लेखकावरील हल्ल्यावर अनेक स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) सलमान रश्दी यांच्यावरील प्राणघातक हल्ला निंदनीय असल्याचे म्हटले आहे. स्वराने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि लिहिले की, 'सलमान रश्दींसाठी माझ्या प्रार्थना. लज्जास्पद, निषेधार्ह आणि भ्याड हल्ला!’


पाहा पोस्ट :



जगविख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यांना चाकूने वार करून जखमी करण्यात आले आहे. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला झाला आहे. दरम्यान काही प्रत्यक्षदर्शींनी सलमान रश्दी यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे ट्वीट केले असून, एक घटनास्थळाचा व्हिडीओही यावेळी पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी हल्लेखोराला पकडण्यापूर्वी रश्दी यांच्यावर अनेक वेळा वार करण्यात आले होते.


त्यानंतर प्रेक्षकांमधील काही सदस्य मंचावर देखील गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान न्यूयॉर्कच्या गव्हर्नर यांनी सलमान त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती दिली आहे.


न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक संशयित स्टेजवर आला आणि त्याने सलमान रश्दी आणि त्यांच्यासोबत आलेल्या मुलाखतकारावर हल्ला केला. रश्दी यांच्या मानेवर वार करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनीही या प्रकरणी खुलासा केला आहे. कॅथी हॉचुल यांनी सांगितले की, 'ते जीवित असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियंत्रकावरही हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून, आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.’


कोण आहेत सलमान रश्दी?


भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. त्यांची पहिली कादंबरी 1975मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यांना त्यांच्या ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’साठी (1981) बुकर पारितोषिक देखील मिळाले. ही कादंबरी आधुनिक भारताबद्दल आहे. त्यांचं चौथं पुस्तक, ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’मुळे (1988) त्यांना वादात अडकावे लागले होते. सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकासाठी त्यांना अनेक धमक्या देखील आल्या आहेत. या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पुस्तकात इस्लाम धर्माची निंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या वादानंतर आलेल्या धमक्यांना न जुमानता त्यांनी 1990च्या दशकात अनेक कादंबऱ्या लिहिल्या. 2007 मध्ये इंग्लंडच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांनी त्यांना साहित्य क्षेत्रातील सेवांसाठी 'सर' ही पदवी प्रदान केली होती.


हेही वाचा :


In Pics : ब्लॅक ड्रेसमध्ये स्वराचा बोल्ड अंदाज, चाहते म्हणतात...


Swara Bhasker : उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल!