Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) लग्न केलं आहे. स्वरा आणि फहादनं स्पेशल मॅरेज अॅक्ट'च्या अंतर्गत लग्न केले. स्वरानं खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन लग्नाबाबत माहिती दिली आहे. आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक जण स्वरा आणि फहाद यांना शुभेच्छा देत आहेत.  राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट शेअर करुन फहाद आणि स्वराला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अभिनेत्री कंगना रनौतनं देखील स्वरा आणि फहाद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट


जितेंद्र आव्हाड यांनी स्वरा आणि फहाद यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वरा आणि फहाद यांचा फोटो शेअर करुन लिहिलं, 'माझा प्रिय मित्र फहाद अहमद आणि स्वरा यांना शुभेच्छा.' 






कंगनाची पोस्ट


अभिनेत्री कंगना रनौतनं स्वराच्या फोटोला कमेंट केली. तिनं कमेंटमध्ये लिहिलं, 'तुम्ही दोघेही खूप आनंदी दिसत आहात. लग्न हे दोन हृदयांचे होते. बाकी सर्व तर फॉरमॅलिटी असतात.'






अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन स्वरा आणि फहाद यांना शुभेच्छा दिल्या. 




अभिनेत्री सोनम कपूरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन स्वरा आणि फहाद यांना शुभेच्छा दिल्या. सोनम आणि स्वरानं वीरे दी वेडिंग या चित्रपटामध्ये काम केलं. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या दोघींच्या मैत्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 



स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. स्वरा ही सोशल मीडियावर विविध विषयांवर मतं मांडते. तसेच ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो देखील शेअर करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Swara Bhasker: स्वरानं 'स्पेशल मॅरेज अॅक्ट'च्या अंतर्गत केलं लग्न; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आईचे दागिने आणि साडी...'