Swara Bhasker: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही फहाद झिरार अहमदसोबत  (Fahad Zirar Ahmad) विवाहबद्ध झाली. फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरानं (Swara Bhasker) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ शेअर करुन फहाद आणि तिच्या लग्नाची माहिती दिली आहे. 

स्वरानं शेअर केला व्हिडीओ


अभिनेत्री स्वरा भास्करनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'काहीवेळा तुम्ही तुमच्या शेजारी असलेली एखादी गोष्ट दूरवर शोधता. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री मिळाली. माझ्या हृदयात तुझं स्वागत आहे.' स्वरानं शेअर केलेल्या व्हिडीओला फहादनं रिप्लाय देखील दिला आहे. त्या रिप्लायमध्ये लिहिलं, 'हा गोंधळ इतकी सुंदर असू शकते हे मला माहीत नव्हते. प्रेमानं माझा हात धरल्याबद्दल मी आभार मानतो.'






स्वराचे चित्रपट


स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही महिन्यांपूर्वी स्वरा 'जहां चार यार' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली.  या चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारली. 


स्वरा ही विविध विषयांवरील मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी स्वरानं श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबत देखील ट्वीट केले होते. रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट या विषयांबाबत देखील तिनं सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त केली होती. स्वराला इन्स्टाग्रामवर 1 मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत. स्वरा इन्स्टाग्रामवर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Swara Bhasker : ‘शाहरुख खानमुळे मी अजूनही सिंगल’, किंग खानने लव्हलाईफ उद्ध्वस्त केल्याचा स्वरा भास्करचा आरोप!