Swara Bhaskar on Body Shaming : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या कणखर बोलीसाठी ओळखली जाते, ती अनेक वेळा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा स्वरा भास्कर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने स्वत:ची तुलना ऐश्वर्या रायसोबत केली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर लग्न आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ती ट्रोलिंगची शिकार होताना दिसत आहे. वाढलेल्या वजनामुळे नेटकरी स्वरा भास्करचं बॉडी शेमिंग करत आहेत. हेटर्स तिच्यावर वारंवार निशाणा साधत आहेत. स्वरा भास्करने बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सला चांगल्याच शब्दात उत्तर दिलं आहे. स्वरा भास्करने बॉडी शेमिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.  

बॉडी शेमिंग करणाऱ्यांना स्वराचं कडक शब्दात उत्तर

अभिनेत्री स्वरा भास्करने बॉडी शेमिंग करणाऱ्या टोलर्सला कडक शब्दात उत्तर दिलं आहे, यादरम्यान तिने स्वत:ची तुलना विश्वसुंदरी ऐश्वर्या रायसोबत केली आहे. यावेळी तिने तिचं कौतुक करताना स्वत:ला ऐश्वर्याची सर्वात मोठी चाहती म्हटलं आहे. बॉडी शेमिंगबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, या लोकांनी ऐश्वर्या रायलाही सोडलं नाही, तर यामध्ये मी कोण आहे. स्वराने याबाबतीत नेमकं काय म्हटलं ते जाणून घ्या.

नेमकं काय म्हणाली स्वरा भास्कर?

स्वरा भास्करने बॉडी शेमिंगबद्दल द्वेष करणाऱ्यांना कडक शब्दात उत्तर देताना म्हटलं की, "महिला लोकांच्या नजरेत, विशेषतः ग्लॅमर जगात, राहू शकत नाहीत. ग्लॅमर जगात महिलांना कधीही एकटे सोडता येणार नाही. काय, कसे, जीवनाचे पर्याय, या सर्वांवर नेहमीच चर्चा होते". स्वराने अलिकडे बीबीसी न्यूज इंडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

"ऐश्वर्या रायला सोडलं नाही, तर मी कोण...", 

बॉडी शेमिंगबद्दल बोलताना स्वरा भास्करने ऐश्वर्या रायचं उदाहरण दिलं. यावेळी तिने म्हटलं की, आराध्याला जन्म दिल्यानंतर ऐश्वर्यालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. प्रसूतीनंतर ऐश्वर्या रायचं वजनही खूप वाढलं होतं. त्यावेळी तिलाही टीकेला सामोरं जावं लागलं. जाणूनबुजून तिचे वाईट फोटो काढले गेले आणि ते व्हायरल केले गेले. त्यावेळी तिने सर्वकाही सभ्यतेने हाताळलं, असं म्हणत स्वराने ऐश्वर्याचं कौतुक करत आपण तिची फॅन असल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : मॉडेलने कपडे घातले की नाही, हे कळणं देखील कठीण; रेड कार्पेटवर ट्रान्सपरेंट ड्रेस घालणं महागात, ग्रॅमी अवॉर्ड्समधून प्रसिद्ध गायकासह पत्नीची हकालपट्टी