मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातला चॉकलेट हिरो म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीची ओळख आहे. या चॉकलेट हिरोला गोड बातमी मिळाली आहे. स्वप्नील जोशीला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
सोमवारी रात्री स्वप्निलची पत्नी लीनाने एका मुलीला जन्म दिला. स्वप्निल-लीना यांच्या आयुष्यात आलेल्या छोट्या परीमुळे कुटुंबीयांसह मित्र-मंडळींमध्येही आनंदाचं वातावरण आहे.
बाळाच्या बातमीमुळे स्वप्निल जोशीला डबल सेलिब्रेशनची संधी चालून आली आहे. संजय लीला भन्साळी यांचा पहिला वहिला मराठी चित्रपट 'लाल इश्क' प्रदर्शनाच्या वाटेवर असून स्वप्नील जोशी त्यात मुख्य भूमिकेत आहे.