Sushmita Sen Taali teaser Out : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) ओटीटी विश्वात अधिराज्य गाजवलं आहे. सुष्मिताच्या 'आर्या' या वेबसिरीजला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आता अभिनेत्रीची आगामी 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता तृतीयपंथी गौरी सावंतच्या (Gauri Sawant) भूमिकेत दिसणार आहे.  'ताली'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट झाला आहे. 


'ताली' ही वेबसीरिज येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृतीयपंथ्यांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज असणार आहे. गौरी सावंतच्या भूमिकेत सुष्मिताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


'ताली'च्या टीझरमध्ये काय आहे? 


'ताली' या टीझरच्या सुरुवातीला गौरी सावंतच्या भूमिकेत सुष्मिता म्हणत आहे,"नमस्कार मी गौरी. तुमची श्री गौरी सावंत. जिला कोणी हिजडा बोलतं, तर कोणी सामाजिक कार्यकर्ती, कोणी नाटकी म्हणवतं, तर कोणी गेम चेंजर. ही गोष्ट हाच सर्व प्रवास तुम्हाला दाखवणार आहे".


'गाली से ताली तक”, “स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता मला हे तिन्हीही हवं आहे, असे संवाद या टीझरमध्ये आहेत. सुष्मिताने या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने लिहिलं आहे,"गाली से ताली पर्यंतचा प्रवास". 'ताली'चा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.






'ताली' कधी होणार प्रदर्शित? (Taali Web Series Released Date)


सुष्मिता सेनच्या 'ताली' या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अप्रतिम, आता प्रतीक्षा फक्त तालीची, तू एक प्रेरणा आहेस, तुझा खूप अभिमान वाटतो, प्रेरणादायी 'ताली', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. ही बहुचर्चित सीरिज 15 ऑगस्ट 2023 रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होत आहे.


रवी जाधव (Ravi jadhav) दिग्दर्शित या सीरिजचं लेखन क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) यांनी केलं आहे. 'ताली' या वेबसीरिजचे सहा एपिसोड असणार आहेत. तृतीयपंथीयांचा संघर्ष उलगडणाऱ्या या सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सुष्मिताच्या आगामी चित्रपटांची आणि वेब सीरिजची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Sushmita Sen: सुष्मिता सेन साकारणार गौरी सावंत यांची भूमिका; शेअर केला 'ताली' मधील लूक