1995 मध्ये मिस युनिव्हर्स बनलेल्या चेल्सी स्मिथला सुष्मिता सेनने मुकूट घातला होता. सुष्मिताने ही स्पर्धा 1994 मध्ये जिंकली होती. "मला तिचं हास्य आणि परिपक्व व्यक्तिमत्त्व अतिशय आवडायचं. माझ्या प्रिय मैत्रिणीच्या आत्म्याला शांती मिळो. चेल्सी स्मिथ, मिस युनिव्हर्स 1995," असं सुष्मिता सेनने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
या पोस्टसह सुष्मिताने चेल्सी स्मिथसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुष्मिता सेन चेल्सीला मुकूट घालताना दिसते. सुष्मिताने 21 मे 1994 रोजी फिलिफाईन्समध्ये मिस युनिव्हर्सचा मान मिळवत मुकूट जिंकला होता. सुष्मितानेच पहिल्यांदा भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून दिला होता.
चेल्सी स्मिथने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम करुन या इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली होती.