माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन सध्या 42 वर्षाची आहे. तर तिचा कथित बॉयफ्रेंड रोहमन शॉल हा केवळ 27 वर्षांचा आहे. त्या दोघांच्या अफेअर आणि लग्नाची चर्चा सुरु आहे. परंतु काल सुष्मिताने इन्स्टाग्रामवर तिचा व्हर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओवर तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. की लोक जेव्हा तुमच्याबाबत चर्चा करत असतात तेव्हा मी व्हर्काऊट करत असते. सर्व गॉसिप हे बेकार आहे. आत्ता माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. मी आत्ता आयुष्याशी रोमांस करत आहे. मला जे बोलायचे होते, ते मी बोलले आहे.
बॉलीवुड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार सुष्मिता आणि रोहमन गेल्या वर्षी गाला येथील एका फॅशन शोमध्ये भेटले. त्यानंतर दोन महिने त्यांनी एकमेकांना डेट केले. त्यामुळेच आता या दोघांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. परंतु सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचे तोंड बंद केले आहे.