मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. परंतु चित्रपट फार चांगला नसल्याचे मत समीक्षकांनी आणि चित्रपट पाहुन चित्रपटगृहाबाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी मांडले. तर दुसऱ्या बाजुला या चित्रपटाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. या चित्रपटावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत. परंतु बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी मात्र या चित्रपटाच्या बाजूने उभा राहिला आहे.
चित्रपटाचे समर्थन करताना सुनिल म्हणाला की, ''आजकाल प्रत्येकजण स्वतःला चित्रपट समीक्षक समजत आहे. लोकांनी या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्यामुळे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली''.
सुनिलने चित्रपट कसा आहे यावर सांगितले की, ''मी हा चित्रपट पाहिलेला नाही, परंतु माझे असे खूप मित्र आहेत ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे. त्या सर्वांना हा चित्रपट आवडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही वेळा आपण एखाद्या चित्रपट किंवा अभिनेत्याकडून मोठ्या अपेक्षा करतो. परंतु आजकाल प्रत्येकजण स्वतःला समीक्षक समजत आहे. त्यांना वाटते की, मनोरंजनाबाबत त्यांना सर्व काही समजतं. परंतु मला वाटते की, प्रत्येक चित्रपटाला आपण योग्य पद्धतीने प्रदर्शित होऊ द्यायला हवे थोडा वेळ द्यायला हवा. त्यानंतर प्रेक्षकांनी त्यांचे मत मांडायला हवे.
'ठग्ज...'ला ट्रोल करणाऱ्यांवर चिडला सुनिल शेट्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Nov 2018 12:17 PM (IST)
आमीर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. परंतु 'ठग्ज'ला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना अभिनेता सुनिल शेट्टीने झापले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -